इन्सुलिनची सक्रियता वाढवण्यासाठी…

माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - इन्सुलिनच्या स्रावाची निर्मिती योग्य प्रकारे व्हावी यासाठी संतुलित आहार आणि व्यायाम यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शरीरात इन्सुलिनचा स्राव योग्य प्रकारे होत नाही तेव्हा मधुमेहपूर्व लक्षणे दिसून येतात. त्याचबरोबर मधुमेह होण्याची शक्यता बळावते. शरीरात निर्माण होणारी इन्सुलिन रेझिस्टन्सची स्थिती ही मधुमेह होण्याची शक्यता दर्शवते. या स्थितीत जर आपण योग्य आरोग्यदायी जीवनशैली अंगिकारली तर मधुमेहासारखा विकारही नियंत्रणात राहू शकतो. त्यासाठी संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करावा. व्यायाम आणि आहार यामुळे रक्तातील शर्करा नियंत्रित राहाते शिवाय हृदयाच्या समस्याही दूर ठेवण्यास मदत करते. इन्सुलिन रेझिस्टन्स आहारावर लक्ष केंद्रीत केल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी देखील कमी करता येते. इन्सुलिनची सक्रीयता वाढवण्यासाठी कोणते उपाय करता येतील ते पाहूया.

आहाराच्या टिप्स :
आहारात हाय प्रोसेस्ड आणि पॅकबंद आहार घेण्याऐवजी प्रक्रिया केलेला आहार सेवन केला पाहिजे. हार्ड प्रोसेस्ड फूड अर्थात प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये व्हाईट ब्रेड, पास्ता, तांदूळ यांचा समावेश होतो आणि हे पदार्थ शरीरात अचानक शर्करेचे प्रमाण वाढवू शकतात. अशा प्रकारचा आहार खूप हानीकारक असतो. त्याव्यतिरिक्त प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो. त्यामुळे या पदार्थांमुळे मधुमेह होण्याचा धोका वाढतो.

भाज्यांचे प्रमाण :
आहारात भाज्यांचे प्रमाण अधिक असावे, कारण भाज्यांमध्ये कॅलरीचे प्रमाण जास्त नसते तसेच तंतुमय पदार्थांचे प्रमाणही कमी असते. या प्रकारचा आहार रक्तातील साखर नियंत्रित कऱण्याचे काम करतात. इन्सुलिन योग्य प्रकारात सक्रिय राहाण्यासाठी आहारात टोमॅटो, हिरव्या शेंगा, गाजर, लाल पिवळ्या ढोबळी मिरच्या, हिरव्या भाज्या जसे पालक, कोबी, आदींचा समावेश असावा.

फायबर फ्रूटस :
मधुमेहामवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि इन्सुलिनची सक्रीयता वाढवण्यासाठी उच्च प्रतीचा तंतुमय पदार्थ आहारात सामील केले पाहिजेत. त्यामध्ये सफरचंद, बेरीज, केळे, द्राक्षे, आलुबुखार इत्यादी फळांचा समावेश असावा. आहारातील समाविष्ट पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असावा आणि ते पदार्थ आहारा सामील करावेत. या आहारामुळे रक्तशर्करा नियंत्रित राहाण्यास मदत होते.

हेल्दी किंवा आरोग्यदायी मेद :
आहारात मेदाचा समावेश असला पाहिजे, परंतू ते अनसॅच्युरेटेड हेल्दी किंवा असंपृक्त आरोग्यदायी मेद असावे. त्यामुळे पचनाची प्रक्रिया सावकाश होते आणि शरीराला आवश्यक त्या फॅटी ॲसिडची पूर्तता करते. त्यामुळे आहारात जवस आणि अक्रोड यांचा समावेश असावा. आरोग्यदायी फॅटसबरोबर प्रथिने मॅग्नेशिअम, तंतुमय पदार्थ आदी भरपूर प्रमाणात असावेत. त्या व्यतिरिक्त ॲव्हाकॅडो आणि ऑलिव्ह यांचीही निवड करावी.

दुग्धउत्पादन :
हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी आहारात कॅल्शिअमयुक्त पदार्थांचा समावेश असणे गरजेचे आहे. नैसर्गिकरित्या कॅल्शिअम मिळण्याचा उत्तम स्रोत म्हणजे दुध आणि दुधाचे पदार्थ. दुध किंवा दुग्धोत्पादनाची निवड करताना त्यामध्ये मेदाचे प्रमाण कमी असेल, याकडे लक्ष द्यावे. उच्च चरबी असलेले पदार्थ इन्सुलिनवर प्रभाव पाडतात. त्याव्यतिरिक्त सोया मिल्क किंवा गायीचे दूध सेवन करणेही फायदेशीर ठरते.

सर्व प्रकारची धान्ये :
इन्सुलिनची सक्रीयता कायम राखण्यासाठी आहारात जीवनसत्त्व, तंतुमय पदार्थ, खनिजे या सर्वांचा योग्य प्रमाणात समावेश असला पाहिजे. काही लोक रक्त शर्कराला नियंत्रित करण्यासाठी आहारातील कार्बोहायड्रेटचे प्रमाण खूप कमी करतात. मात्र शर्करा नियंत्रित करण्यासाठीचा हा आरोग्यदायी मार्ग नव्हे. कार्बोहायड्रेट शरीराला उर्जा देण्याचे काम करतात. त्यामुळेच इन्सुलिन सक्रीय राहाण्यासाठी प्रक्रिया न केलेला आहार सेवन करावा.

शेंगवर्गीय भाज्या किंवा बीन्स आणि डाळी :
तंतुमय घटकांचा उत्तम स्रोत म्हणून बीन्स कडे पाहू शकतो. मधुमेहाच्या रूग्णांनी शेंगवर्गीय भाज्यांचे सेवन केल्यास रक्तातील शर्करा पातळी वाढत नाही. मधुमेहाच्या रूग्णांनी लाल आणि काळ्या रंगाच्या डाळी सेवन केल्या पाहिजेत. वाळवलेल्या शेंगवर्गीय भाज्या किंवा सुकलेल्या बीन्सचा वापर करणार असाल तर त्यात मीठाचा वापर करू नये. असेच काही विशेष नटस्‌ आणि बिया देखील आहारात सामील कराव्यात. या नट्‌स मध्ये ओमेगा ३ आणि ओमेगा ६ फॅटी असिड असते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post