व्हॉलीबॉल स्पर्धेत हिंगणगाव, वाळकी, आर्मी संघांची जिल्हा पातळीवर निवड


माय नगर वेब टीम

अहमदनगर - तालुका स्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत चौदा व सतरा वर्ष वयोगटातील न्यू इंग्लिश स्कूल हिंगणगाव विद्यालयाचे चार संघ व एकोनावीस वर्ष वयोगटतील आर्मी स्कूल व न्यू इंग्लिश स्कूल वाळकी संघाची जिल्हा पातळीवर निवड.

जिल्हा क्रिडा कार्यालय व नगर तालुका क्रिडा समिती यांच्या वतीने वाडीया पार्क येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन एम. टि. सोनवणे व रामदास सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. चौदा वर्ष सतरा वयोगटातील मुलांचा अंतिम सामना न्यू इंग्लिश स्कूल हिंगणगाव विरूध्द अवतार मेहेरबाबा अरणगाव यांच्यात झाला. या दोन्ही सामन्यात हिंगणगाव संघ विजय झाला. या सामन्यात प्रणव कांडेकर, प्रणव झावरे, शमवेल पाचारणे, ओंकार खोडदे, स्वप्नील खेसे, सार्थक होले, शुभम कांडेकर, शुभम जाधव यांनी उत्कृष्ट खेळी केली. 14 वर्ष वयोगटातील मुलींचा अंतिम सामना न्यू इंग्लिश स्कूल हिंगणगाव विरुध्द यशश्री अकॅडमी धनगरवाडी यांच्यात झाला. हिंगणगाव संघ विजयी झाला. या सामन्यात श्रेया सोनवणे, स्नेहल कांडेकर, आकांक्षा झावरे, स्वरांजली मोरे, भाग्यश्री राऊत यांनी संघाची बाजू चांगली ठेवली. सतरा वर्षे मुलींचा वयोगटातील अंतिम सामना न्यू इंग्लिश स्कूल हिंगणगाव विरुद्ध न्यू इंग्लिश स्कूल वाळकी यांच्यात झाला. हा सामना हिंगणगाव संघाने जिंकला. या सामन्यात साक्षी जपकर, श्रावणी जपकर, प्रिती जपकर, आंकक्षा ढगे यांनी उत्कृष्ट खेळी केली. १९ वर्ष वयोगटातील मुंला चा अंतिम सामना आर्मी पब्लिक स्कूल विरुद्ध अवतार मेहेरबाबा यांच्या झाला. हा सामना आर्मी पब्लिक स्कूलने जिंकला . १९ वर्षे वयोगटातील मुलींचा अंतिम सामना विरुद्ध आर्मी स्कूल विरुद्ध वाळकी यांच्यात झाला . वाळकी संघाने हा सामना जिंकला. यावेळी नगर तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष महेंद्र हिंगे, शिरीष टेकाडे, दत्ता पाटील नारळे, विजय जाधव, बाळासाहेब मते, बाळासाहेब ढमढेरे, एम. टि. सोनवणे, रामदास सोनवणे, वैभव शिंदे, संतोष रोहकले उपस्थित होते शाहदाब मोमीन, सागर आळकुटे, शुभम पालवे, दुर्गेश शिंदे, ऋषभ लाहोर, विशाल गायकवाड यांनी पंच म्हणून होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post