कचरा डेपोची आग मनपात भडकली ; आरोग्याधिकारी तडकाफडकी निलंबित


माय नगर वेब टीम
अहमदनगर : सावेडी कचरा डेपोला लागलेल्या आगीचा भडका महापालिकेपर्यंत पोहोचला असून या आगीत जिल्हाधिकारी तथा महापालिका प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी घनकचरा व्यवस्थापन प्रमुख तथा आरोग्याधिकारी डॉ. एन. एस. पैठणकर यांच्या निलंबनाचे आदेश काढले असल्याची माहिती सूत्रांकडून समजते.
महापालिकेच्या सावेडी कचरा डेपोला सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आग लागली होती. महापालिकेचा शेंडी- पोखर्डी रस्त्यावर कचरा डेपो आहे़. शहरासह उपनगरांतील कचरा संकलन करून तो डेपोत साठविला जातो़ साठविलेल्या कच?्यापासून खत बनविले जाते़ या ठिकाणी साठविलेल्या कचऱ्याच्या ढिगाºयाला सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आग लागली़. काही वेळात कचºयाच्या ढिगाºयाला आगीने वेढले़ वारा असल्याने आग भडकली होती. कच-यात प्लास्टिक असल्याने प्रशासनाला आग विझविण्यात यश आले नव्हते. या सर्व परिस्थितीला पैठणकर यांना जबाबदार धरण्यात आले असून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
दरम्यान वारंवार चुकीची माहिती दिली असून कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post