केडगावात मनपा कर्मचाऱ्याला धमकीमाय नगर टीम

महापालिकेच्या सफाई कामगारांना केडगावच्या भूषणनगर परिसरात शिवीगाळ, दमदाटी करून धमकी दिल्याची घटना गुरुवारी (दि.9) सकाळी 8.30 च्या सुमारास घडली. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी मिलिंद मुकूंद कुलकर्णी (रा.भूषणनगर) याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

महापालिकेचे सफाई कामगार जालिंदर चंद्रकांत बोरगे (वय 46, रा.पाच गोडावून, केडगाव) व त्यांचे सहकारी भूषणनगरच्या गणपती मंदिराजवळ दैनंदिन साफ- सफाईचे व कचरा संकलनाचे काम करत असताना आरोपी मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांना ‘माझ्या घरासमोर ट्रॅक्टर का उभा केला नाही?’ असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली. याबाबत त्यांना समजावून सांगत असताना त्यांनी जालिंदर बोरगे यांची गचांडी पकडून त्यांना ढकलून दिले व धमकी दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील हे करीत आहेत

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post