राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण या फक्त अफवा- सुप्रिया सुळे


माय नगर वेब टीम

नवी दिल्ली

राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण या फक्त अफवा आहेत असे सांगत विलीनीकरणाबाबतच्या चर्चा खासदार सुप्रिया सुळे यांनी फेटाळून लावल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्या इतपतही काँग्रेसला जागा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन केल्यास विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याएवढ्या जागा होऊ शकतील. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून राष्ट्रवादीला विलीनीकरणाचा प्रस्ताव दिला गेल्याची चर्चा रंगत आहे.

याबाबत आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ‘राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण या अफवा आहेत. अशी कोणतीही चर्चा झाली नाही. ही चर्चा फक्त मीडियामध्ये आहे,’ असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी विलीनीकरणाबाबतच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post